Pimpri Corona Update : शहरात आज 198 नवीन रुग्णांची नोंद, 142 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 198 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजमितीला शहरात 1 हजार 349 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 1 रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 392 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 68 हजार 829 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 349 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 779 रुग्ण गृहविलगीकरणात असून 570 सक्रीय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 34 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 406 आहेत. आज दिवसभरात 4 हजार 339 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 13 लाख 78 हजार 951 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.