Pimpri corona Update : शहरातील 5581 जणांना आज डिस्चार्ज, 1021 नवीन रुग्णांची नोंद, 20 मृत्यू

शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 52 हजार 284 वर पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 5581 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.  शहराच्या विविध भागातील 977 आणि पालिका हद्दीबाहेरील 44 अशा 1021 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 52 हजार 284 वर पोहोचली आहे.

शहरातील 12 आणि पालिका हद्दीबाहेरील 8 अशा 20 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये पिंपळेसौदागर, नेहरूनगर, चिखली, भोसरी, पिंपळेनिलख, निगडी, चिंचवड, रुपीनगर, मोशी, खेड, कामशेत, मंचर, वाघोली, लोणावळा, विश्रांतवाडी  येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 52  हजार  284 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 41 हजार 704 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 891 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 202 अशा 1093 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5725 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.