Pimpri corona Update : कोरोनाचा कहर !  शहरात आज 834 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे.   शहराच्या विविध भागातील 812 आणि महापालिका हद्दीबाहेरील 22 अशा 834 नवीन रुग्णांची आज  (गुरूवारी) नोंद झाली आहे.  ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 139 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 373 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा पाच जणांचा आज मृत्यू झाला आहे.

निगडीतील 82 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 53 वर्षीय पुरुष, भोसरीतील 49 वर्षीय पुरुष, हिंजवडीतील 74 वर्षीय पुरुष आणि पुण्यातील 72 वर्षीय महिला रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 11 हजार 515  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 3890 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1866 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 787 अशा 2653 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1281 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1332 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 51 हजार 870 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 3577 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.