Pimpri: ‘वायसीएमएच’चमध्ये भ्रष्टाचारयुक्त कारभार, विधानसभेत प्रश्न मांडणार – आमदार अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयातील डॉक्टर भरती आणि औषध, साहित्य खरेदीत पारदर्शकता नाही. गलथान आणि भ्रष्टाचारयुक्त कारभार सुरु असल्याचा आरोप करत वायसीएमएचच्या भ्रष्टाचाराबाबत विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे.

वायसीएमएच रुग्णालयाचे व्यवस्थापन मानधनावरील डॉक्टरांकडे आणि पी.जी. इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरुपी डॉक्टर प्राध्यापकांची नेमणूक हा विरोधाभास आहे. पी.जी. इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरुपी डॉक्टर प्राध्यापकांच्या नेमणूकीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर कोट्यावधी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. वाढणारा आर्थिक बोजा महापालिका प्रशासन करदात्या नागरिकांवरच टाकणार आहे.

सेवेत सुधारणा करण्याऐवजी महापालिका प्रशासन व पदाधिकारी औषध खरेदी आणि डॉक्टर भरतीत मश्गुल आहेत. हि भरती प्रक्रिया व वायसीएमएच मधील औषध व साहित्य खरेदी पारदर्शक नाही. अडीच महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर प्रशासनाने व पदाधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. 750 खाटांच्या रुग्णालय व्यवस्थापन मागील अनेक दिवसांपासून मानधनावरील डॉक्टर सांभाळत आहेत.

आता पी.जी. इन्स्टिट्युट सुरु करण्याची पुर्व तयारी म्हणून 103 डॉक्टर प्राध्यापकांची कायमस्वरुपी पदे भरण्यासाठी मुलाखती सुरु आहेत. वायसीएमएच रुग्णालयाचे व्यवस्थापन मानधनावरील डॉक्टरांकडे आणि पी.जी. इन्स्टिट्यूटसाठी कायमस्वरुपी डॉक्टर प्राध्यापकांची नेमणूक हा विरोधाभास आहे. भरती प्रक्रिया व वायसीएमएच मधील औषध व साहित्य खरेदी पारदर्शक नसल्याचा आरोप आमदार बनसोडे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.