Pimpri Crime : विवाहितेचा छळ करत तिला तलाक देणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ (Pimpri Crime) करत तिला तलाक देणाऱ्या पती व त्याच्या आई-वडिलांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 फेब्रुवारी 2020 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती, सासू व सासऱ्या विरोधात रविवारी (दि.2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPC News Quiz Result 7 : ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – दिवस सातवा… जाणून घ्या विजेत्याचे नाव!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला जाणूनबुजून (Pimpri Crime) शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच पतीने अनैसर्गीक शारीरिक संबंध ठेवला. फिर्यादीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ केली. तसेच जाचक त्रास करत पतीने पीडितेला तलाक देऊन टाकला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.