Pimpri : मैत्रिणीचा पाठलाग आणि विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीचा पाठलाग (Pimpri) करून तिच्याशी एक गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 27) रात्री पिंपरी येथील साई चौक आणि शगुन चौक या परिसरात घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज संजय सुर्वे (वय 25, रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval Crime : जुन्या भांडणातून बाप लेकाला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची जुनी मैत्री (Pimpri) आहे. गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी पिंपरी येथील शगुन चौकात गेल्या होत्या. तिथे आरोपीने त्यांचा पाठलाग केला. त्यांच्याकडे प्रेमाची मागणी करत त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. फिर्यादीस हाताने मारहाण करून फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीला सोडणार नाही, अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.