Pimpri Crime News : पिंपरी, काळेवाडी येथील वेश्या व्यवसाय चालणाऱ्या दोन लॉजवर पोलिसांचा छापा; 12 जणांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालणा-या दोन ठिकाणी रविवारी छापे मारले. या दोन्ही कारवाईत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी पोलिसांनी पहिला छापा सकाळी सव्वा दहा वाजता काळेवाडी रोडवरील सिटी प्लाझा लॉजवर मारला. त्यात चिरंजित देवाशिष सरकार (वय 25), जय भीमबहादूर विश्वकर्मा (वय 20), तिलक करण थापा (वय 19), आकाश प्रदीप बिशी (वय 22, चौघे रा. सिटी प्लाझा हॉटेल, काळेवाडी रोड, पिंपरी), प्रवीण जयसिंग गंगावणे (वय 60, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), अब्दुल हमीद (रा. मोरवाडी चौक, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हॉटेल सिटी प्लाझा येथे आरोपी काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशांतून ते आपली उपजीविका करीत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

पिंपरी पोलिसांनी दुसरा छापा पिंपरी मधील कल्पना लॉज येथे मारला. त्यात बबलू प्रसाद, जयराम आण्णा गोड्डा, अजय कुमार श्रीगणेश यादव (वय 25, रा. कल्पना लॉज, पिंपरी), अजित कुमार श्रीउतीन साव (वय 35, रा. कल्पना लॉज, पिंपरी), शांता पुजारी उर्फ छोटू, दीपक कटारिया (रा. पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी काही महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. आरोपी दीपक कटारिया याने त्याची बिल्डिंग वेश्या व्यवसायासाठी उपलब्ध करून दिली. याबाबत माहिती मिळाली असता पिंपरी पोलिसांनी रविवारी रात्री साडेआठ वाजता छापा मारून कारवाई केली.

वरील दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींच्या विरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, भारतीय दंड विधान कलम 370 अ (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.