Pimpri : पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाचे फूड पॅकेट वाटपासाठी संकेतस्थळ सुरु

एमपीसी न्यूज : कोरोनच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे गोरगरिबांचे अन्नावाचून हाल होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाने नवीन संकेतस्थळ सुरु करून नागरिकांना त्यांच्या घरजवळ जीवनावश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिदार गीता गायकवाड यांनी केले आहे. 

महसुल विभागाच्या अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाने आपल्या कार्यक्षेञातील एकूण ३० गावामधील गरजु, गोरगरीब, निराधार, दिव्यांग, जेष्ठ नागरिक व परराज्यातील मजुर यांच्यासाठी फुडपॅकेटची व्यवस्था केली आहे. त्या करिता ऑनलाईन संकेतस्थळ सुरु करून त्याची अधिकृत लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून गरजु लोकांना त्यांच्या परिसरातील स्वयंसेवी संस्था व पिंपरी चिंचवड मनपाची सर्व क्षेञीय कार्यालयांच्या माध्यमातून तयार अन्न पदार्थ वाटप करण्याची केंद्र गुगल मॅपसह निश्चित करण्यात आली आहे. याकामी एकुण ११ स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

कोरोनाच्या आपत्ती काळामध्ये या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईल अॅपद्वारे फूड पॅकेट सेवा उपलब्ध करुन देण्याचा पुणे जिल्ह्यातील पहिला मान अप्पर पिंपरी चिंचवड कार्यालय, आकुर्डी यांना मिळाला आहे. या सेवेचा सर्व गरजु नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार  गायकवाड यांनी केले आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScNC44xfzZ2x8sclwCcqe99IFilxHqAT6_hmFE5JnWGeDMxKQ/viewform

 हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत नागरिकांना अन्न सेवा पुरविण्यात येत आहे. त्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने घरी राहावे व सुरक्षित राहावे.  गीता गायकवाड – तहसीलदार.
.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.