Pimpri : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस (Pimpri) ठाण्यात दाखल असलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला दरोडा विरोधी पथकाने दापोडी येथून अटक केली. अटक केलेल्या आरोपीवर सात गुन्हे दाखल आहेत.
शंकर संभाजी चौधरी उर्फ गट्टया (वय 21, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरोडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई गणेश सावंत, सुमित देवकर यांना माहिती मिळाली की, पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी दापोडी स्मशानभूमी जवळ येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी स्मशानभूमी परिसरात सापळा लावला. शंकर चौधरी हा स्मशानभूमीजवळ आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याने 3 फेब्रुवारी रोजी (Pimpri )एकास सिमेंट ब्लॉक, लाकडी दांडके, बेल्टने मारून खिशातून रोख रक्कम काढून घेतली असल्याची कबुली दिली. आरोपी विरोधात पिंपरी, एमआयडीसी भोसरी, चिंचवड पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.