Pimpri:  गुड न्यूज! ‘तबलीगी जमात’शी संबंधित आणखी दोघे ‘कोरोनामुक्त’; आज दिला ‘डिस्चार्ज’

14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासातील दोनही रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – दिल्लीतील तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून आलेले आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासातील दोनही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे या दोघांना आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला.  तर, तबलीगी जमातशी संबंधित तिघांसह आजपर्यंत 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलीगी जमातीच्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्यांपैकी दोघांना आणि त्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती.  त्यातील एक जण शुक्रवारी कोरोनामुक्त झाला होता. तर, आज आणखी दोघे कोरोनामुक्त झाले आहेत.

या रुग्णांचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासातील दोनही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, ‘तबलीगी जमात’शी संबंधितच असलेल्या एका रुग्णाचे गुरुवारी (दि. 16) 14 दिवसानंतरचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 57 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 15 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.