Pimpri : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान सहन केला जाणार नाही – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Pimpri)यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला आहे. खर्गे यांचा मी निषेध करतो.

देशातील जनता सावरकर यांचा अवमान सहन करणार नाही, असे भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे म्हणाले.

Sangvi :संत निरंकारी मिशनद्वारा सांगवी येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

गोरखे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे (Pimpri)योगदान काय? आणि त्यांचा पराक्रम काय? असे विचारून खर्गे यांनी संपूर्ण देशभक्तांचा अपमान केला आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याची एकही संधी सोडली नाही. आधी राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकर यांच्यावर टीका करता आहेत. पण एक लक्षात ठेवा, या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही. या अवमानाबद्दल मतदारही काँग्रेसला धडा शिकवतील.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.