Pimpri news : दिवाळी सणाच्या खरेदीला उधाण, पिंपरी बाजारपेठेत वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज : दिवाळी सणासाठी खरेदीला येणाऱ्या नागरिकांमुळे होणारी पिंपरी बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक विभाग (Pimpri news) जास्तीचे वाहतूक कर्मचारी व वार्डन तैनात करणार आहेत. अशी माहिती आनंद भोईटे, उप आयुक्त, वाहतूक विभाग,  पिंपरी-चिंचवड यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली.

पिंपरी कॅम्प मधील बाजारपेठ ही पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे कपडे, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, स्टेशनरी, मोबाईल फोन्स, गृह सजावट साहित्य व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील विविध भागातील नागरिक येथे येतात. यमुळे नेहमी सकाळी व संध्याकाळी येथे नागरिकांची व वाहनांची गर्दी असते. त्यामुळे दररोज येथील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते.

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने नागरिक दिवाळीची खरेदी करण्यासाठी पिंपरी बाजारपेठेत कालपासून येण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी सणासाठी लागणार्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. (Pimpri news) त्यामुळे पुढील काही दिवस व दिवाळीमध्ये दिवाळी सणासाठी खरेदीला येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील रस्त्यांवर तीव्र वाहतूक कोंडी होण्याची अपेक्षा आहे.

Gram panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा समिश्र कौल

याबाबत भोईटे यांना विचारले असता ते म्हणाले की बाजारपेठेतील वाहतूकुंडी कमी करण्याच्या हेतूने वाहतूक विभाग उपायोजना करणार आहे. यासाठी वाहतूक विभाग अतिरकत 10 अंमलदार व 10 वार्डन देणार आहे.

अर्जुन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग म्हणाले की पिंपरी बाजारपेठेतील वाहतूक नियमनासाठी सध्या 10 अंमलदार उपलब्ध आहेत. वाहतूक नियमनासाठी अतिरक्त 10 अंमलदार व 10 वार्डन मिळणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमन करणे अधिक सोपे होईल.(Pimpri news) शगुन, साई, भाटनगर, डिलक्स या प्रमुख चौकात काही अंमलदार व वार्डन तैनात असतील. उरलेले अंमलदार व वार्डन प्रमुख रस्त्यांवर पेट्रोल्लिंग करतील व बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करतील व रस्त्यांवर कोंड होऊ देणार नाही.

भोईटे म्हणाले कि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भाजी मंडई जवळ, क्रोमा शोरूम जवळ व साई चौकाजवळील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स(एच.ए ) च्या जागेवर पे आणि पार्क वाहनतळ सुरु केले आहेत. येथे नागरिकांनी आपली वाहने पार्क करून पायी खरेदीसाठी जावे.(Pimpri news) नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने पार्क करू नयेत व सशुल्क वाहनतलांवर वाहने पार्क करून बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाची मदत करावी, असे आवाहन भोईटे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.