Pimpri : नाट्यगृहाच्या बुकिंगला पालिकेची नकारघंटा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) नाट्यगृहाची 1 जुलैपासून भाडेवाढ करण्यात येणार आहे. मात्र, जुलै महिन्यातील बुकिंग घेण्यापासून आत्तापासूनच नकार दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाची आगाऊ बुकिंग करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह अशी पाच नाट्यगृहे पालिकेने उभारली आहे.

या नाट्यगृहांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच खासगी सभागृहांपेक्षा वाजवी दर आहेत. त्यामुळे या नाट्यगृहात व्यावसायिक नाटक, राजकीय कार्यक्रम, शैक्षणिक संस्थेचे स्नेहमेळावा, इतर मेळावे, समारंभ, स्पर्धा, खासगी कार्यक्रम होत असतात. या नाट्यगृहाची 1 जुलैपासून भाडेवाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, जुलै किंवा त्यापुढील महिन्यांचे बुकिंग घेण्यास आत्तापासूनच टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाची आगाऊ बुकिंग करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 43 – महान पण, कमनशिबी राजिंदर गोयल

याबाबत सांगवी परिसर माहेश्‍वरी मंडळाचे अध्यक्ष सतिश लोहिया (Pimpri) म्हणाले, आमच्या मंडळाचा 15 जुलै रोजी कार्यक्रम आहे. मात्र, नाट्यगृहाच्या दरवाढीमुळे नवी सांगवीतील निळू फुले नाट्यगृहात बुकिंग घेतले जात नाही. वास्तविकता नवीन दरानुसार आम्ही आगाऊ बुकिंग करण्यास तयार आहोत. त्यानंतरही बुकिंग केले जात नाही. त्यामुळे पालिकेचा प्रशासकीय राजवटीत अत्यंत चुकीचा कारभार सुरू असल्याचा आरोपही लोहिया यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.