Pimpri : दिंडी प्रमुखांना पालिका देणार दीड हजार ‘शबनम पिशवी’
एमपीसी न्यूज – “पंढरीची वारी स्वच्छतेची वारी” या उपक्रमा (Pimpri) अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका समाज विकास विभाग थेरगाव युनिट मधील कोविडयोद्धा महिला बचत गटातील महिलांकडून बनवून घेण्यात आलेल्या दीड हजार कापडी शबनम पिशव्यांचे दिंडी प्रमुखांना वाटप करण्यात येणार आहे. तसेच या पिशव्यांमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य किट, माहितीची डायरीही देण्यात येणार आहे.
जगदगुरू श्री.संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा शहरात येणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागताची महापालिकेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे.
दिंडी प्रमुखांना शबनम पिशव्या देण्यात येणार आहेत. या पिशव्या आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे महिला बचत गटातील सदस्यांनी सुपूर्द केल्या. यावेळी समाजसेवक संतोषी चोरघे, बचत गटातील महिला सुवर्णा भालेराव, मंगल कांबळे, रंजना शेंडे, स्मिता अंकुशे, कविता साबळे, समूह संघटक वैशाली खरात, रेश्मा पाटील उपस्थित होते.
Pune : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक
उपायुक्त अजय उपायुक्त चारठाणकर म्हणाले, समाज विकास (Pimpri) विभागामार्फत थेरगाव येथे कोविडयोद्धा महिला बचत गटाचे युनिट सुरू आहे. या महिलांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी पालिकेच्या वतीने “पंढरीची वारी स्वच्छतेची वारी” या उपक्रमा अंतर्गत दिंडी प्रमुखांना दीड हजार कापडी शबनम पिशव्या देण्याचे नियोजन केले आहे.
या पिशवीची साइज 10 बाय 12 इंच असून एका बाजूला पंढरीची वारी, स्वच्छतेची वारी आणि विठ्ठल-रूक्मिणी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. तर एका बाजूला महापालिकेचा लोगो आणि स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या पिशव्यांमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य किट, माहितीची डायरीही देण्यात येणार आहे.