Pimpri: ‘एनसीपी’ संपली; विरोधकांचे ‘डिपॉझीट’ही राहणार नाही -लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – विरोधक भयग्रस्त झाले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या खेळ्या खेळत आहेत. परंतु, या खेळ्या यशस्वी होणार नाहीत. शहरातील तीनही मतदारसंघातील विरोधी उमेदवारांचे ‘डिपॉझीट’ही राहणार नाही, अशी भविष्यवाणी चिंचवडचे भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी केली. तसेच शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस संपली असल्याचेही त्यांनी म्हटले.

महायुतीच्या नेत्यांची आज (बुधवारी) आकुर्डीत बैठक झाली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते.

यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, भोसरीचे उमेदवार महेश लांडगे, पिंपरीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांत सोनकांबळे, खादी व ग्रामविकास मंडळाचे उपसभापती हेमंत तापकीर, सभागृह नेते एकनाथ पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शरहप्रमुख योगेश बाबर, उमा खापरे, शैला मोळक, राजेश पिल्ले, बाबू नायर, महेश कुलकर्णी, अमोल थोरात उपस्थित होते.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतून महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असे सांगून लक्ष्मण जगताप म्हणाले, शहरात केलेली विकासकामे आणि भविष्यातील शहराचे नियोजन करुन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. जनता विकासकामे करणा-यांना पसंती देईल.

भोसरीचे उमेदवार महेश लांडगे म्हणाले, लोकसभेला देखील विरोधकांनी भाजप विरोधात मोठ बांधली होती. परंतु, ती यशस्वी झाली नाही. आताही तेच होणार आहे. जनता विकास कामे करणा-यांच्या पाठिशी उभी राहते. आम्ही शहरातील विकास कामाच्या जोरावर जनतेसमोर जात आहोत.

पिंपरीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार म्हणाले, बंडखोरांना जनता थारा देणार नाही. विरोधकांचे डिपॉझीट’ देखील राहणार नाही. महायुतीच्या तीनही उमेदवारांचा विजय निश्चित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.