Pimpri News: इंग्लंडहून आलेला आणखी एक जण पॉझिटीव्ह; शहरात आज 121 नवीन रुग्णांची नोंद

156 जणांना डिस्चार्ज; 3 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 121 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 96 हजार 316 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इंग्लंडहून आलेला आणखी एक जण पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरातील एक आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा तिघांचा आज मृत्यू झाला आहे. सांगवीतील 70 वर्षीय महिला, मावळातील 55 वर्षीय पुरुष, खेड येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 96 हजार 316 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 107 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1752 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 722 अशा 2474 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 644 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1110 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

इंग्लंडहून आलेले आणखी एक पॉझिटीव्ह

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 215 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 167 प्रवाशांची चाचणी केली. असून 112 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत. दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उर्वरित 53 अहवाल प्रलंबित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.