Pimpri News: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहर काँग्रेसची 75 किलोमीटरची पदयात्रा

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात मिळून 75 किलो मीटरची आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे. (pimpri News) याबाबतती माहिती माजी महापौर कविचंद भाट यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अधिक माहिती देताना शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले की, 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या कालावधीत शहर काँग्रेसचे सर्व माजी महापौर, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, इंटक, एनएसयुआय आणि सर्व विभाग व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभाग घेणार आहेत.

पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात प्रत्येकी साधारणता 25 किलो मीटरची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेची सुरवात क्रांती दिनाच्या दिवशी  मंगळवारी (दि.9) पिंपरी विधानसभा मतदार संघातील पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी येथील शहिद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून आझादी गौरव पदयात्रेस सुरवात करण्यात येणार आहे. दापोडी परिसर, फुगेवाडी, कासारवाडी परिसरात ही यात्रा काढण्यात येणार आहे.

तसेच सायंकाळी 5 वाजता पिंपरी कॅम्प,  येथून पुन्हा ही पदयात्रा सुरू होईल. त्याच प्रमाणे चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघातही नियोजित वेळापत्रकानुसार राष्ट्र पुरूषांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरवात करण्यात येणार आहे. (Pimpri News) या पदयात्रेचे नेतृत्व त्या त्या भागातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिक व काँग्रेस पदाधिकारी करणार आहेत. 9 ऑगस्ट ते  15 ऑगस्ट  दरम्यान सकाळी व संध्याकाळी निघणा-या आझादी गौरव पदयात्रेमध्ये परिसरातील बालगोपालासह, विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिक, कामगार बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्ष कदम यांनी केले.

Pune Mumbai Express Way : पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ट्रक ड्राइवरचा मृत्यू

या पदयात्रेचा समारोप सोमवार 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8.30 वाजता चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर चौक येथे 75 मशाली प्रज्वलीत करून व क्रांतिकारकांना अभिवादन करून करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट सोमवारी मध्यरात्री 12.05 मिनिटांनी क्रांतिवीर चापेकर चौक येथे राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच 75 स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे.

माजी नगरसेवक बाबू नायर यांनी आवाहन केले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रीय काँग्रेसचे तात्कालिन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह कश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई या विविध धर्मातील विविध जाती व पंथातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. या स्वातंत्र्य लढ्यात हजारो नागरिकांनी बलिदान दिले आहे.( Pimpri News) या स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात अशा सर्व शहिद योद्ध्यांना, नागरिकांना पदयात्रा सुरू होताना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. या पदयात्रेत सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे असे आवाहल त्यांनी केले.

पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष  कैलास कदम, ज्येष्ठ नेते अशोक मोरे, तानाजी काटे, माजी नगरसेविका निगार बारस्कर, माजी नगरसेवक बाबू नायर, महिला शहराध्यक्षा सायली नढे,  युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवा दल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष अॅड. उमेश खंदारे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मालशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, मेहबुब शेख, चक्रधर शेळके, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे विशाल सरवदे, आशा भोसले, धनाजी गावडे, अण्णा कसबे, उमेश बनसोडे, पांडुरंग जगताप, मिलिंद फडतरे, छायावती देसले, चंद्रकांत काटे, रवी कांबळे, किरण खाजेकर, किरण नढे, आकाश शिंदे, विजय ओव्हाळ, जुबेर खान आदी उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.