Pune Mumbai Express Way : पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ट्रक ड्राइवरचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे – मुंबई एक्सप्रेसवेवर (Pune Mumbai Express Way) आज सकाळी 9.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात खोपोली येथे एका ट्रकने पुढील कार, एस टी महामंडळाची शिवनेरी बस व कंटेनरला धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर दोन किरकोळ जखमी झाले आहेत.

खोपोली पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी घाट संपल्यावर खोपोली एग्जीटच्या थोडे पुढे झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो पुढे असलेल्या कार व एस टी महामंडळाच्या शिवनेरी बसला धडकला. त्यानंतर तो ट्रक एका कंटेनर ट्रकला जाऊन जोरदार धडकला. त्याचा पुढचा भाग पूर्ण चकाचूर झाला असून ट्रक ड्राइवर त्यात अडकून मरण पावला.

Chikhali : पादचारी महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

कारमधील एकास तसेच बसमधील एकास किरकोळ (Pune Mumbai Express Way)  जखमा झाल्या आहेत. मयत ड्राइवर व दोन्ही जखमी व्यक्तींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथेच जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.