Vallabhnagar : वल्लभनगर येथे कारची तोडफोड करत एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – सिमेंटच्या गट्टूने कारची (Vallabhnagar) तोडफोड करत एकाला मारहाण केल्याची घटना वल्लभनगर येथे शनिवारी (दि.6) रात्री सव्वा दहा वाजता घडला.

याप्रकरणी करण वंजारे (वय 21 रा.चिंचवड), प्रथमेश (पूर्ण नाव माहिती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय शिरीष कोठारी (वय.37 रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

Chikhali : पादचारी महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या ओळखीचे असून फिर्यादी हे वल्लभनगर येथे असताना आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीला मारहाण करत त्यांच्या कारची सिमेंटच्या गट्टूने तोडफोड केली. फिर्यादीला मारहाण केली. तसेच, त्यांच्या पाकीटातील तीन हजार रुपये काढून घेतले. यावरून पिंपरी (Vallabhnagar) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.