Pimpri News : वाहनचालक दिनानिमित्त वाहन चालकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – वाहनचालक दिनानिमित्त राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनच्या वतीने चालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी टँकर, ट्रेलर, शिवनेरी, रिक्षा चालक आणि बस चालक यासह विविध वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शुक्रवारी (दि. 17) हा कार्यक्रम पार पडला. 

या वेळी राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, कोषाध्यक्ष निलेश गांगुर्डे, महाराष्ट्र वाहन चालक महासंघ अध्यक्ष बाबा शिंदे, पुणे बस व कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, कार्याध्यक्ष किरण देसाई, सुरेश देवकर, विनायक पाटकर, प्रकाश भालेराव, यशवंत भोसले आदी उपस्थित होते.

राज्यात सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी एसटी डेपो, आरटीओ कार्यालय, वाहन चालक, ऑक्सीजन टँकर वाहन चालक, शिवनेरीचे वाहन चालक यांचा सत्कार केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.