Pimpri News: ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये : अमोल थोरात

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी तयार केलेला अहवाल राज्य सरकारने पुरेसा अभ्यास करुन तयार केलेला नाही. त्यामध्ये संशोधनाचा अभाव आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे आगामी निवडणुका आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुका आरक्षाशिवाय घेवू नये. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रवक्ते व संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर महाविकास आघाडी सरकार प्रारंभीपासूनच गंभीर नव्हते. आताही सरकार गंभीर दिसत नाही. वेळकाढूपणा केल्यामुळे ओबीसी समाजावर आघात झाला आहे. 5 मार्च 2021 पासून ते आतापर्यंत सरकारने टोलवाटोलवी केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाविरोधात निकाल झाला.

दरम्यान, राज्यातील आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षासह झाल्या पाहिजेत, अशी भाजपाची मागणी आहे. यासाठी भाजपा संघर्ष करणार आहे. ओबीसी समाजाच्या पाठिशी भाजपा खंबीरपणे राहणार आहे, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.