Pimpri News : रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा हंडा मोर्चा काढणार

माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा इशारा

एमपीसी न्यूज – रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा. अन्यथा ( Pimpri News ) महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा  माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिला.

 

काटे म्हणाले आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग 28 रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरात गेली कित्येक दिवस कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेतर्फे दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, तो पण अपुरा व कमी दाबाने, तसेच या परिसरात सोसायटी संख्या जास्त असून कमी व अपुऱ्या होणा-या पाणी पुरवठ्यामुळे सोसायटीना खासगी टॅकर मागवावे लागत आहे.

 

 

Pimpri News : ‘कोविड योद्धां’ना कायम स्वरुपी सेवेत घेण्याची मागणी

 

 

याचा सोसायटी धारकांना आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागतो. लाखो रुपये कर भरून सुद्धा महापालिका दैनंदिन गरज असलेला पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात करू शकत नसल्याने नागरिकांच्या दररोजच्या तक्रारींच्या रोषास लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना विचारले असता टाळाटाळ केली जाते. उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.

 

पिंपळेसौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे गेली एक वर्ष झाले पाण्याची टाकी बांधून तयार झालेली असून ( Pimpri News ) आजपर्यंत या टाकीवरून सोसायट्याना अद्यात पाणीपुरवठा चालू केलेला नाही. मार्च महिना संपत आला आहे. उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यातच दिवसाआड पाणी आणि तो ही कमी दाबाने असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.