Chakan News : नाणेकरवाडी येथे दोन वर्षीय मुलीला वाहनाची धडक

एमपीसी न्यूज –  सोसायटीच्या गार्डन मध्ये  खेळणाऱ्या (Chakan News) दोन वर्षाच्या मुलीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. हा अपघात नाणेकरवाडी येथील श्रेया लान्स सोसायटी येथे घडला आहे.

 

याप्रकऱणी सत्यदेवकुमार गोरख चौरसिया (वय 32 रा.नाणेकरवाडी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune News : पुण्यात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची दोन वर्षाची मुलगी बिल्डींगच्या गार्डनमध्ये खेळत होती. यावेळी (एम एच 14 जी एल 3368) चा चालक हा वेगात गाडी घेऊन आला (Chakan News) व त्याने फिर्यादी यांच्या मुलीला धडक दिली ज्यात मुलगी जखमी झाली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.