Pune News : आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केले पुणे शहराचे अंदाज पत्रक

एमपीसी न्यूज -सध्या राज्यातील सर्व महापालिकामध्ये प्रशासकांच्या (Pune News )माध्यमांमधून काम केले जात आहे.त्या पार्श्वभूमीवर आगामी 2023/24 करीता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 9 हजार 515 कोटींचे अंदाज पत्रक सादर केले आहे.हे अंदाज पत्रक सादर करताना अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

 

Pimpri News : देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे – अजित गव्हाणे

 

मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेटमध्ये 923 कोटींची भर करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी 1321 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील मलिनिसरण साठी 812 कोटी रुपये तर घनकचरा व्यवस्थापनसाठी 846 कोटींची तरतूद केली आहे. वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी 590 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे, पगार आणि पेन्शनवर सुमारे 3100 कोटी खर्च होणार आहे.

 

पुण्याच्या अर्थसंकल्पातील मुद्दे

 

पुण्यातील रस्त्यासाठी 992 कोटी रुपयांची तरतूद

पी एम पी एल साठी 459 कोटी रुपयांची तरतूद

पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी 468 कोटी रुपये

आरोग्यासाठी 505 कोटी रुपयांची तरतूद

नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार, यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद

मिळकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ नाही

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात 8 नवीन उड्डाणपूल उभारणार

नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद

पगार आणि पेन्शनवर सुमारे 3100 कोटी खर्च होणार

पुण्यात होणारे काही महत्त्वाचे प्रकल्प:

पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार

वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल

सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार

डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश

श्वान प्रेमींसाठी पुण्यात डॉग पार्क उभारण्यात येणार

शहरात फेरीवाले यांच्यासाठी देखील hawkers प्लाझा/ hawkers पार्क उभी करणार

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.