Pimpri News : गांधीपेठ तालीम मित्रमंडळाकडून चिपळूण येथील संग्रहालयाला मदत

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे चिपळूण येथील सुप्रसिद्ध लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या संस्थेच्या ग्रंथालय आणि दुर्मिळ वस्तुसंग्रहालयाचे नुकसान झाले. संग्रहालयातील खालच्या मजल्यात पाणी व चिखल साठला असून स्वच्छता व दुरूस्तीचे काम सुरू आहे. चिंचवड येथील गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या संस्थेला पंचवीस हजार मदतनिधी देण्यात आला.

गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण या संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांना आज बुधवारी (दि.01) प्रत्यक्ष भेटून मदतीचा धनादेश सुपुर्द केला.

यावेळी ग्रंथपाल गौरी भोसले तसेच मित्रमंडळाचे अंकुश इंगळे, संदीप जंगम, महेश गावडे, राहुल वाघुले, विपुल नेवाळे आदी उपस्थित होते.

ग्रंथालय आणि दुर्मिळ वस्तुसंग्रहालयात सध्या वस्तू स्वच्छ करणे, दुरुस्त करणे, त्यांची पुन्हा मांडणी करणे याचबरोबर पुन्हा नव्याने कपाटे बनविणे इत्यादी कामे सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.