Pimpri News: महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाने आज (मंगळवारी) उल्लेखनीय सेवेसाठी देशातील अग्निशमन सेवेच्या एकूण 42 अधिकारी -कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर केली आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले. ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर,अग्रणी अग्निशमक सुरेश पाटील आणि संजय म्हमूनकर तसेच अग्निशमक चंद्रकांत आनंददास यांचा समावेश आहे.

बाळू देशमुख यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’

अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. तर मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

दरम्यान, कुठलीही दुर्घटना घडली की सगळ्यात आधी मदतीसाठी तत्पर असत ते म्हणजे मुंबई अग्निशमन दल, घटनेची माहिती या दलाला मिळताच अग्निशमन दलातील जवान घटना स्थळी दाखल होतात. आपल्या जिवाची बाजी लावत अडचणीत सापडलेल्या नागरिकांना ते वाचवतात. यंदा महाराष्ट्रातील सात जणांना अग्निशमन सेवेतील कामगिरीसाठी पदक जाहीर झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.