Pimpri News: शहरातील 29,157 पैकी 20,264 रुग्ण बरे, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 69.49 टक्के

Pimpri News: Out of 29,157 patients in the city, 20,264 were cured, 69.49 per cent were corona free कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण फक्त 1.16 टक्के आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पण, त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. आजपर्यंत शहरातील 29 हजार 157 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण केवळ 1.16 टक्के आहे. त्यातील तब्बल 20 हजार 264 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल 69.49 टक्के आहे. तर, वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 485 जणांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण 1.66 टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा पुन्हा ‘रेडझोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढत असली. तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे. 10 मार्चपासून आजपर्यंत शहरातील 29,157 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण फक्त 1.16 टक्के आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

तसेच बाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-यांचे प्रमाण जास्त आहे. आजपर्यंत बाधित झालेल्या 29 हजार 157 पैकी तब्बल 20 हजार 264 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.49 टक्के आहे.

तर, वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. पालिका रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये 4871 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर, शहरातील खासगी रुग्णालयात, होम आयसोलेट असे सुमारे साडेतीन हजार सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसाला 15 ते 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आजपर्यंत शहरातील 485 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण 1.66 टक्के आहे. तर, शहराबाहेरील पण पालिका रुग्णालयात उपचार घेणा-या 116 जणांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.