Pimpri News : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज ‘राजमाता’ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती’ उत्साहात (Pimpri News)  साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे बाशा शेख, गीता साळुंके,अमित जोशी (सुरेश नाईक स्पेस पार्क चे मॅनेजर), शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  ‘राजमाता’ जिजाऊ व स्वामी विवेकानंद’ प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  एन्जल परिहार, पूनम पौड, स्वराली शिंदे, अर्पिता तिवारी, भावेश नखाते या विद्यार्थ्यांनी ‘राजमाता’ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या शौर्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली. सहशिक्षिका सौ.निशा पवार आणि देवर्षी नंदी यांनी  विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

Pune News : समाजात बंधुतेचा विचार रुजविण्याची गरज – शंकर आथरे

‘राजमाता’ जिजाऊ व स्वामी विवेकानंद ‘ यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. उर्मिला ठोंबरे यांनी  केले व इयत्ता आठवीच्या श्रावणी साळुंके Pimpri News या विद्यार्थिनीने आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.