Pimpri news: रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर भागात कोरोनाचे सर्वाधिक 1483 सक्रिय रुग्ण

आपल्या भागात किती ॲक्टीव्ह रुग्ण?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. पालिकेच्या ‘ब’ प्रभागाच्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड हद्दीत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 1483 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी या भागात कोरोनाचे 1459 सक्रिय रुग्ण आहेत. हे दोनही प्रभाग कोरोना हॉटस्पॉट आहेत.

महापालिकेने शुक्रवारी (दि.25) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. शहरातील 7 हजार 408 सक्रिय रुग्णांवर पालिका रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या 75 हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 74 हजार 116 जणांना कालपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 60 हजार 764 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.

तर, खासगी रुग्णालये, होम आयसोलेशन असे 13 हजार 352 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 1229 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 438 अशा 1667 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो.

शुक्रवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर या भागात कोरोनाचे सर्वाधिक 1483 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या !

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 895 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वाधिक म्हणजेच 1483 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात सर्वात कमी म्हणजेच कोरोनाचे 488 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 594 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात 1459 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रभागातील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात येत आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 964 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 907 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 618 सक्रिय रुग्ण आहेत.

एकूण 7408 सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.