Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात शालेय संस्था, सरकारे कार्यालये यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेकांनी विविध उपक्रम राबविले. आचार, विचार स्वातंत्र्य, समानता आणि एकतेचा संदेश या उपक्रमांमधून देण्यात आला.

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा

रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रोपांचे वाटप, मास्क-सॅनिटायझर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार, डॉक्टर, परिचारिका आदींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे, पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, डॉ. कीर्ती गायकवाड, डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण, उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रामा सुरेश भोरखडे यांच्या मार्गदर्शनखाली या सर्व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

तृतीयपंथीयांकडून काळेवाडी येथे वृक्षरोपण आणि रोपांचे वाटप करण्यात आले. यासाठी उद्यान विभागाचे अधिकारी गोरख गोसावी व इतर कर्मचाऱ्यांचे साहाय्य लाभले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तृतीयपंथीयांमार्फत नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच वाहतुकीचे व कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

नवीन थेरगाव रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात. गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सफाई कामगार आणि आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून गुलाबाचे फूल देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य अधिकारी बी.बी कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक शैलेश वाघमारे, मुकादम शिवपुत्र नंदर्गे, श्रीकांत कदम यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे म्हणाले, की समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. तो बदलण्याची गरज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त तृतीयपंथीयांच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. यापुढेही असे समाजहिताच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही उंडे यांनी केले.

डॉ. कीर्ती गायकवाड म्हणाल्या, आज प्रजासत्ताक दिना निमित्त रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे समाजाच्या दृष्टीने उचललेले पाऊल अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्याकडे समाजाने एक आदर्श म्हणून पाहावे आणि त्याप्रमाणे कृती करावी. डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य परिचारिका सरला चव्हाण आणि इतर सर्व रुग्णालयातील स्टाफने संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि तृतीयपंथी यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

एड्सग्रस्त मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिनावर यंदा कोरोनाचं संकट होते. परंतु विद्यार्थ्यांना आनंद देण्यासाठी ममता फाउंडेशन (कात्रज) मधील एड्सग्रस्त विद्यार्थ्यांसोबत ‘हेल्पिंग हॅण्ड’ ट्रस्ट’ आणि शिवतीर्थ प्रतिष्ठान वतीने प्रजासत्ताक दिन’ साजरा केला. या उपक्रमाचे 17 वे वर्ष होते, अशी माहिती ‘हेल्पिंग हॅण्ड’ ट्रस्टचे गिरीश गुरनानी यांनी दिली.

ममता फाउंडेशन शाळेतील उपस्थित 30 एड्सग्रस्त मुलांना झेंडे, फुगे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. झेंडे आणि फुगे यामुळे शाळेचे वातावरण आनंदमय झाले होते. यावेळी मुलांना खाऊ देण्यात आला, असे हेल्पिंग हॅण्ड’ ट्रस्टचे गिरीश गुरनानी आणि ‘शिवतीर्थ प्रतिष्ठान’ चे अमोल गायकवाड यांनी सांगितले.

‘झेंडा, फुगे, खाऊ मिळाल्यानंतर पीडित मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता. समाजाचा एड्स ग्रस्त रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही त्यामुळे त्यांची नेहमी हेटाळणी होते. अशा रुग्ण मुलांना आनंद देण्याच्या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम संस्था गेली 17 वर्ष राबवत आहे अशी माहिती गिरीश गुरनानी आणि अमोल गायकवाड यांनी पत्रकद्वारे दिली. यावेळी मिलिंद शिंदे, विशाल विचारे, सागर पळे, मंगेश भोंडवे, संतोष सोनावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

——————

माजी महापौर राहुल जाधव यांनी केले विविध सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण

चिखली प्रतिनिधी चिखली जाधववाडी मोशी मध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला चिखली जाधववाडी तसेच मोशी या ग्रामीण पट्ट्यामध्ये अनेक नवीन गृह प्रकल्प नव्याने विकसित झाले आहेत यासर्व गृह प्रकल्पा मध्ये प्रजासत्ताक दिना निम्मित पिंपरी चिंचवड शहराचे मा. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते धवजारोहन पार पडले आज सकाळी राहुल जाधव आणि मंगल राहुल जाधव यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात झाली या मध्ये प्रामुख्याने साई जीवन मनपा शाळा, अभिनव विद्यालय जाधववाडी, अंगणवाडी, विठ्ठल रुख्मिनी मंदिर, संत सावंत महाराज भाजी मंडई ,वडाचा मळा, सुभाष धायरकर मित्र मंडळ वाडा, तसेच ऐश्वर्याम म्हाडा, इंद्रधनू सोसायटी, शंकेश्वर क्रिमसन, शंकेश्वर ड्रीम्स, मिलिनियम म्यानर, साई वस्तू पार्क, अक्षा वृंदावन, अक्षा एम्पायर अश्या विविध ठिकाणी राहुल जाधव यांच्या हस्ते धवजारोहन पार पडले राहुल जाधव यांनी विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिना निमित्त शुभेच्छा देताना सर्वांनी कोरोनच्या या काळा मध्ये योग्य ती काळजी घेण्याचे व शहर व आपला परिसर स्वछ ठेवण्याचे आव्हान केले यावेळी राहुल जाधव यांच्या समवेत मंगल राहुल जाधव तसेच अनेक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक विविध सोसायट्यांमधील सभासद मिथ्या संख्येने उपस्थित होते.

——————
दापोडी येथे पोलीस कर्मचा-याच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय जनता पार्टी दापोडी वतीने आरोग्य कर्मचारी व पोलीस नाईक खुशाल वाळुंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य विशाल वाळुंजकर, शिवसेना युवा नेते गोपाल मोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस उपाध्यक्ष अस्मिता कांबळे, भाजपा अनुसूचित जाती मंडल अध्यक्ष धर्मेंद्र शिरसागर भाजपा महिला आघाडी सदस्य जयश्री नवगीरे, सामाजिक कार्यकर्ते आमीर भाई शेख, भाजपा मंडल उपाध्यक्ष घनश्याम सकट, सतीश मटपरधी, भाजपा महिला आघाडी प्रभाग अध्यक्षा सविता सूर्यवंशी शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदा ओव्हाळ, सुनील ओव्हाळ, मकरंद शिंदे, भाजपा प्रभाग उपाध्यक्ष राजू कानडे, आयटी सेलसंयोजक सुधीर चव्हाण, आबा कोळेकर, सुभाषजी सिंगल, विष्णू आडगळे, युवराज वाळुंजकर, उपस्थितांचे स्वागत आमीर शेख यांनी तर आभार धर्मेंद्र शिरसागर यांनी मानले.

——————

यशस्वी संस्थेच्या आयआयएमएसच्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी हिताची एस्टेमो ब्रेक सिस्टिम्स इंडिया प्रा.लि.चे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक संजय आंभोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर यशस्वी संस्थेच्या ‘यशोगाथा’  विशेषांकाचे प्रकाशन करण्यात  आले. तसेच प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने आयोजित करण्यात  आलेल्या ई  वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह या उपक्रमांतर्गत  यशस्वी संस्थेतील सदस्यांनी  तसेच अन्य नागरिकांनी  जमा केलेल्या  वापरात नसलेल्या  इलेक्ट्रॉनिक  वस्तू प्रातिनिधिक स्वरूपात  पुर्नवापरासाठी  तसेच योग्य पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी सामाजिक संस्थेला देण्यासाठी समन्वयक पवन शर्मा यांच्याकडे  सुपूर्द  करण्यात  आल्या.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या  आदेशानुसार मर्यादित  उपस्थिती सह  कोविड  नियमावलीचे पालन करीत कार्य्रक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.याप्रसंगी आभार व्यक्त करताना  आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे  यांनी  उपस्थितांना प्रजासत्ताक  दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांनी स्वतःला  एखाद्या  सामाजिक कार्यात  गुंतवून घेण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे  ऑपरेशन हेड कृष्णा सावंत, संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ  व्यवस्थापिका मनीषा खोमणे, मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी, अमृता तेंडुलकर यांच्यासह संस्थेचे विद्यार्थी व अध्यापक वर्ग उपस्थित होते.

———————–

Novel international school मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल संभाजीनगर चिंचवड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी भारत माता पूजन करून ध्वजारोहण केले याप्रसंगी समीर जेऊरकर, प्राचार्य मानसी हसबनीस उपस्थित होते. ऑनलाइनद्वारे दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑनलाइनद्वारे काही नृत्य, कथा, विविध कला प्रदर्शन केले गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.