Pimpri News : मॉरिशस च्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मध्ये संजय पवार व नेहा पवार दाम्पत्याचा सन्मान

एमपीसी न्यूज- दीर्घकाळ हिंदी भाषा आणि साहित्याच्या सेवेबद्दल महात्मा गांधी संस्थान मॉरिशस च्या भव्य सभागृहात जगप्रसिद्ध साहित्यिक डॉ.श्री.रामदेव धुरंधर यांच्या हस्ते भारतीय जैन संघटनेचे पिंपरी येथील सेवानिवृत्त प्रा.संजय पवार व नेहरू नगर पिंपरी येथील वसंतदादा पाटील माध्यमिक (Pimpri News)व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या नेहा पवार या दाम्पत्याचा “सहोदरी सन्मान” या उपाधीने सन्मानपत्र, शाल,स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

10 जानेवारी या विश्व हिंदी दिनाच्या निमित्ताने मॉरिशस या देशातील महात्मा गांधी संस्थान आणि दिल्ली येथील भाषा सहोदरी हिंदी न्यास भारत यांच्या संयुक्तपणे आयोजित नववे हिंदी आंतरराष्ट्रीय अधिवेशन दिनांक 10 व 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. अन्य देशांसह भारतातून 24 राज्यातील 127 प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी भाषा सहोदरी न्यास दिल्लीचे अध्यक्ष श्री. जयकांत मिश्रा, डॉ. ब्रह्मदेव प्रसाद  कार्यी, मीना चौधरी, डॉ अंजली चिंतामणी (मॉरिशस) यांचेसह अन्य काही मान्यवर उपस्थित होते.

Bhosari Murder : पत्नीचा खून करणारा पती 27 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मध्ये भारतीय भाषांचा अभ्यास आणि संशोधन कार्य सुरू असून भाषा सहोदरी हिंदी न्यास दिल्ली ही संस्था हिंदी भाषेच्या विकास आणि प्रचार या दृष्टीने कार्य करत आहे. मॉरिशस येथे 10 व 11 जानेवारी रोजी झालेल्या या अधिवेशनात भाषेच्या माध्यमातून भारत व मॉरिशस मैत्री संबंध कसे दृढ होतील तसेच सर्व भाषा विकासासाठी काय प्रयत्न केले पाहीजेत याविषयी चर्चा व निर्णय घेण्यात आले. तत्पूर्वी दिनांक 10 जानेवारी या विश्व हिंदी दिनाच्या दिवशी अधिवेशनाचे उद्घाटन मॉरिशस चे विद्यमान राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रुपन यांचे हस्ते करण्यात आले.

आपल्या भाषणात पृथ्वीराज सिंह रुपन यांनी भारत मॉरिशस मैत्री तसेच भारत करत असलेल्या सहाय्याचा उल्लेख केला व आभार व्यक्त केले आणि मॉरीशियन लोकांना भारताचा(Pimpri News) अभिमान आहे असे सांगितले. या उद्घाटन कार्यक्रमात मंचावर,महात्मा गांधी संस्थान आणि रवींद्रनाथ टागोर संस्थान चे अध्यक्ष  प्रेमलाल महादेव, महानिदेशक राजकुमार रामप्रताप, निदेशिका डॉ. विदोतमा कुंजल, भाषा सहोदरी हिंदी न्यास भारत चे अध्यक्ष जयकांत मिश्रा हे मान्यवर उपस्थित होते.

Alandi News : आळंदी मध्ये वै. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या दहाव्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन

या दोन दिवसाच्या अधिवेशनानंतर देश विदेशातील विविध भाषेचे साहित्यिक समवेत मॉरिशस दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. मॉरिशस ची राजधानी पोर्ट लुईस येथिल अप्रवासी घाट,गंगा तलाव सह संपूर्ण मॉरिशसचे दर्शन घेतले.विविध भाषा,विविध संस्कृती असलेल्या या देशात स्वच्छ सुंदर नागमोडी रस्ते,स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, गडद हिरवीगार वनराई, अतिशय शिस्तबद्ध असलेली रस्त्यावरील ट्रॅफिक,तेथील नागरिकांमध्ये असलेली विलक्षण विनम्रता या सर्व गोष्टींमुळे सर्व प्रतिनिधी (Pimpri News)भारावले होते.

     मॉरिशस येथे झालेल्या या सन्मानासाठी प्रा.संजय पवार व प्राचार्या नेहा पवार या दाम्पत्याचे मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.