Pimpri News: शहरातील 6 हजार 721 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) वतीने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून 6 हजार 721 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित फेरीवाल्यांनी आधारकार्ड, रेशनकार्ड सोबत ठेवावे, असे आवाहन भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी केले आहे.

शहरातील फेरीवाल्यांचे 1 नोव्हेंबरपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण विनामूल्य, बायोमेट्रिक पद्धतीने होत आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या शहरात कामगार, कष्टकरी, उद्योजक यांचा अधिवास अधिक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खाजगी एजन्सीची नेमणूक (Pimpri News) करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण जोरदारपणे सुरू आहे. शहराच्या इंडेक्‍समध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून यामध्ये नागरिक आणि फेरीवाले यांची भूमिका महत्वाची आहे. त्यादृष्टीने 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त जोशी यांनी दिल्या आहेत. शहरात यापूर्वी 10 हजार फेरीवाल्याची नोंद होती. आता 20 ते 22 हजार फेरीवाले शहरात असण्याचा अंदाज महापालिका प्रशासनाला आहे. तर सर्वाधिक फेरीवाले अ, फ आणि क क्षेत्रीय कार्यालयामध्ये आहेत.

Charohali News: संविधान दिनानिमित्त चऱ्होलीत विद्यार्थ्यांना शपथ

फेरीवाला सर्वेक्षणासाठी संबधित फेरीवाल्यांकडे आधारकार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डचे पहिले पान व शेवटचे पान यांची एका पानावरील छायांकित असणे अनिवार्य आहे. जातप्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वतःजवळ असावी. दिव्यांग, घटस्फोटीता, परितक्ता महिलांसाठी अनुषंगिक पुराव्याची प्रत असणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांना यापूर्वी पथविक्रेता प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्यांनी प्रमाणपत्र सादर करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.