Pimpri News : धनादेशाचा गैरवापर करत खात्यातून सव्वा तीन कोटी ट्रान्सफर
एमपीसी न्यूज – धनादेशाचा (Pimpri News) दुरुपयोग करून तसेच खात्यावरून आरटीजीएसद्वारे रक्कम ट्रान्सफर करत तीन कोटी 33 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पवना बँकेत घडला. याप्रकरणी सोमवारी (दि. 21) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार उदय भाऊसाहेब वाघेरे (रा. पिंपरीगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Wakad : समाजसेवा करतो म्हणून कोयत्याने वार करत पत्नीचाही केला विनयभंग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचे चुलते सुदाम उर्फ सुधीर वाघिरे यांच्या धनादेशाचा दुरुपयोग करून खात्यावरील 34 लाख आठ हजार रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. तसेच, फिर्यादी यांच्या वडिलांच्या खात्यावरील दोन कोटी 99 लाख 70 हजार रुपये (Pimpri News) आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेत वडिलांची आणि भावाची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.