Pimpri News: पिंपरी चिंचवड पोलिसांचे ट्विटर हँडल जवळपास एक वर्षापासून बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांचे ट्विटर अकाउंट जवळपास एक वर्षापासून बंद आहे. या हँडलवरती 30 एप्रिल 2021 रोजी पोलिसांनी शेवटचे ट्विट केले आहे. त्यानंतर आठ महिने झाले तरी या हँडलवरती एकही पोस्ट शेअर करण्यात आलेली नाही.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी जुलै 2019 रोजी ट्विटर अकाउंट सुरू केले. त्यांचे 51 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शहरातील अनेक नागरिक हे हँडल फॉलो करतात. पण, 30 एप्रिल 2021 नंतर एकही पोस्ट यावरती शेअर झाली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पोलिसांकडून येणारी विविध माहिती मिळत नाहीये.

ट्विटरची विश्वासाहर्ता चांगली मानली जाते, अनेक नामांकित नेते, राजकारणी, क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील लोक तसेच सरकारी विभाग देखील अधिकृतरित्या माहिती जाहिर करण्यासाठी ट्विटरचा वापर करतात. शासनाच्या विविध विभागाची अधिकृत माहिती मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यांची अधिकृत हँडल्स फॉलो करतात.

याबाबत माहिती देताना पिंपरी चिंचवड पोलीस जनसंपर्क अधिकारी मनिष कन्याणकर म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड पोलिसांचे ट्विटर अकाऊंट सुरुच आहे, फक्त मागील काही दिवस पोस्ट नाही शेअर केल्या. येत्या एक दोन दिवसात अकाऊंटवरून पोस्ट शेअर होतील.’

पुणे पोलिसांचे ट्विटर अकाउंट नेहमी अद्यावत ठेवण्याचे काम तेथील विभाग करतो. अनेक महत्वपूर्ण आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक माहिती यावरून शेअर केली जाते. जानेवारी 2016 रोजी सुरू झालेले पुणे पोलिसांचे ट्विटर अकाउंटला चार लाखाहूंन अधिक जण फॉलो करतात.

तसेच, मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाउंटला 50 लाख लोक फॉलो करतात. मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाउंट नेहमी अप टू डेट असते. अतिशय कूल पोस्टसाठी प्रसिद्ध असलेले हे अकाउंट एक महिला कर्मचारी हाताळते. 2015 साली मुंबई पोलिसांचा अधिकृत ट्विटरप्रवेश झाला, तेव्हापासून तर आजवर आपल्या भन्नाट पोस्ट्सने मुंबई पोलीस ट्विटर खात्याने लोकांची वाहवा मिळवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.