Pimpri News: शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज –  छत्रपती शिवरायांचा जयघोष करत आबाल वृद्धांच्या उपस्थितीत आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रजाहितदक्ष रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुराज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकारून लोककल्याण केले असे प्रतिपादन  महापौर उषा ढोरे यांनी केले. शिवजयंतीनिमित्त शहरवासीयांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

प्रारंभी मुख्य प्रशासकीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर  हिराबाई घुले, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, उद्यान अधिक्षक संजय गोसावी, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा ढोरे यांनी भक्ती शक्ती चौक, एच . ए. कॉलनी पिंपरी, कासारवाडी,  फुगेवाडी आणि दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच उपमहापौर हिराबाई घुले यांनी लांडेवाडी चौक, भोसरी पी.एम. टी. चौक, मोशी गांव वेशीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मोहननगर, प्रेमलोक पार्क, थेरगांव डांगे चौक, थेरगांव गावठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

भक्ती शक्ती चौक निगडी, येथील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य अमित गावडे, अजित गव्हाणे, नगरसदस्या कमल घोलप, शर्मिला बाबर, शैलजा मोरे, सुमन पवळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य मारुती भापकर, भीमा बोबडे यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. एच . ए. कॉलनी पिंपरी येथील कार्यक्रमास नगरसदस्या सुलक्षणा धर उपस्थित होत्या. कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी येथील कार्यक्रमास नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित काटे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, स्वाती काटे उपस्थित होते.

लांडेवाडी चौकात झालेल्या कार्यक्रमास नगरसदस्या सोनाली गव्हाणे, क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर शाळकरी मुले छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेष परिधान करून कार्यक्रमात उपस्थित होते. भोसरी पीएमटी चौकातील कार्यक्रमास नगरसदस्य संतोष लोंढे, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण, प्रशासन अधिकारी नाना मोरे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. मोशी येथील कार्यक्रमास नगरसदस्य लक्ष्मण सस्ते, नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, माजी उपमहापौर शरद बोराडे यांच्यासह मोशी ग्रामस्थ उपस्थित होते.

मोहनगर येथील कार्यक्रमास नगरसदस्या मीनल यादव, वैशाली काळभोर, माजी नगरसदस्य मारुती भापकर उपस्थित होते. थेरगांव डांगे चौक येथील कार्यक्रमास ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, माजी नगरसदस्य सिद्धेश्वर बारणे उपस्थित होते. थेरगांव गावठाण येथील कार्यक्रमास ग प्रभाग अध्यक्षांसह  अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने शिवजयंती उत्साहात

कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगरसेवक  विक्रांत लांडे , समीर  मासुळकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गगंध, घरकाम महिला आद्याक्षा अशा कांबळे, सदाशिव तळेकर, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे,दीपक  गिरे महाराज,अनिल गाडे,इसाक भाई, महारष्ट्र रिक्षा पंचायत कार्याध्यक्ष राज शेलार, रविंद्र लंके, अविनाश जोगदंड, राम शिंदे, आपरोच कोतवाल, प्रमोद शेलार, सूरज सोनावणे, नंदलाल निकम, विकास आढळे, बबन काळे, सतीश चौरे, बांधकाम ठेकेदार पंचायत, राजू साहू, रणजित साह, मुकेश ठाकूर,  कष्टकरी जनता आघाडी  गौरी शेलार, माधुरा डांगे,रेखा भालेराव, पाटील ताई, शर्मा ताई, उषा पुजारे, वर्षा सोनवणे, अंजु कांबळे, छाया कलवले, अंजली कांबळे, काजल कांबळे, सुनीता यंशवते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, ”रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, असे बजावून  रयतेची काळजी घेणारे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचे विचार आजच्या काळात देखील जोपासले जात आहेत. आज देशाची झालेली वाताहत पाहता शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच देशाला उपयोगी ठरतील

तापकीर शाळेच्या वतीने “शिवजयंती उत्साहात साजरी

काळेवाडी येथील शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत तापकीर व पुणे केमिस्ट्र असोशिएशनचे विवेक तापकीर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सतीश बोचरे या विद्यार्थ्यांने पोवाडे सादर करून स्फूर्तीदायी वातावरण तयार केले. प्रज्ञा घाग, श्रावणी धस, भाग्यश्री पठारे, चैतन्या पाठक सार्थक ढेंगळे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास मांडून उपस्थितांची दाद मिळविली. विद्यार्थ्यांनी शिवाजी पाळणा, जिजाऊ वंदना, शिवस्तुती व बालगीत इत्यादी नृत्य सादर केले. पल्लवी पाचाबोले हिने तलवारबाजी, लाठी फिरवणे सारख्या मर्दानी खेळाचे सादरीकरण करून उपस्थितांची अंगावर शहारे आणले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.