Pimpri News : शहरातून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातून दोन दुचाकी ( Pimpri News ) चोरीला गेल्या आहेत. हॉटेल समोरून दुचाकी चोरीला हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. ही घटना मंगळवारी (दि. 21) रात्री साडेनऊ ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास मोरवाडी येथे घडली. 

 

अब्दुल महम्मद खालीद चौधरी (वय 28, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14/एडब्ल्यू 6614) मोरवाडी येथील एका हॉटेल समोर पार्क केली. पाऊण तासात त्यांची दुचाकी चोरीला गेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

Pune News : ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए राजेश अग्रवाल

 

अवघ्या वीस मिनिटात दुचाकी चोरीला कासारवाडी येथील एका हॉटेल समोरून दुचाकी चोरीला गेली. ही घटना 8 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता अवघ्या वीस मिनिटात घडली. दीपक शशिराव शिंदे (वय 41, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 23) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम एच 14/एफडब्ल्यू 2444) कासारवाडी येथील एका हॉटेल समोर पार्क केली. अवघ्या वीस मिनिटात त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. भोसरी पोलीस तपास ( Pimpri News ) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.