Pimpri : नदीवरील पुलाचे काम संथगतीने, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर (Pimpri) येथे सुरु असलेल्या नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरु आहे. गेली 2 वर्षे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश व्ही.एम. मातेरे इंफ्रा .( इ ) प्रा.ली. यांना 22 डिसेंबर 2022 रोजी 18 महिने कालावधीसाठी देण्यात आलेले आहेत.

तसेच या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार याकामी मे.ओएस असीस्टीम स्तूप यांची निविदा पूर्व व निविदा पश्चात कामाकरिता नेमणूक करण्यात आलेली आहे.

PMRDA : व्यापारी दुकान गाळ्यांसाठी आरक्षण लागू नाही, ई लिलाव सर्वांसाठी खुला

या कामाची मुदत संपून देखील अद्यापपर्यंत 60 टक्के देखील काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना देखील ठेकेदाराने मुदतवाढीची मागणी केली. बीआरटीएस विभागामार्फत मुदतवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. हा भाववाढ प्रस्ताव मान्य करून पुन्हा नव्याने कामास मुदतवाढ देण्यात आली होती.

या सर्व प्रकरणामध्ये नागरिकांना वेठीस धरून ठेकेदाराचे तसेच सल्लागाराचे हित जोपासण्याचा महापालिकेचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर येत आहे. ज्या कामास व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच काम नियोजनबद्ध करण्यास महापालिका यंत्रणा देखील आहे.

असे काम वेळेवर होत नाही यासारखी शोकांतिका दुसरी (Pimpri) असू शकत नाही. विकासकामे ही नागरिकांच्या सोयीसाठी असतात याचा विसर बहुतेक महापालिकेच्या बीआरटीएस विभागाला पडलेला दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.