Pimpri :  पवना, इंद्रायणी या नद्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्प ‘एसईआयएए’च्या ना-हरकत दाखल्यामुळे  रखडला  

एमपीसी न्यूज –  पवना, इंद्रायणी या नद्यांचा (Pimpri )पुनरुज्जीवन प्रकल्प रखडला आहे. राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाच्या (एसईआयएए) ना-हरकत दाखल्यामुळे प्रकल्प थांबला आहे. त्यांची मान्यता मिळताच काम सुरु केले जाणार असल्याचे महापालिका अधिका-यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या   (Pimpri )तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी 24.34 किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी 20.85किलोमीटर आहे. तर, मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. तीनही नद्यांसाठी 3 हजार 506 कोटींचा खर्च महापालिका करणार आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनाच्या राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची (एसईआयएए) मंजुरी आवश्यक आहे.

त्यासाठी महापालिकेने परवानगीचा अर्ज केला होता. परंतु, तो फेटाळण्यात आला. नदीचे पुनरुज्जीवन करताना पूर पातळी वाढणार नाही. भारतीय मानकशास्त्राचे पालन करावे. नदीची वहन क्षमता कमी होता कामा नये, नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे.

 

Pimpri : पुनावळे आणि चिखलीच्या विकास आराखड्यातील रस्त्याच्या जागेचा आगाऊ ताबा

पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याबाबत केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र यांच्याकडून पडताळणी करावी. त्यानंतरच अर्ज मंजुरीसाठी पाठविण्याची सूचना ‘एसईआयएए’ने केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता केली आहे. ‘सीडब्ल्यूपीआरएस’ यांच्याकडून पडताळणी करून घेतली आहे. त्यानुसार मंजुरीसाठी अर्ज केला असल्याचे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.