Pimpri : महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 25 कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज – आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असा लौकिक प्राप्त केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2018-19 या आर्थिक वर्षात मिळकत कर, बांधकाम परवाना, पाणीपट्टी, आकाश चिन्ह व परवाना या विभागातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे. तब्बल 1 हजार 25 कोटींचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. दरम्यान, गतवर्षीपेक्षा यंदाचे उत्पन्न कमी आहे. गेल्यावर्षी महापालिकेला तब्बल दोन हजार 900 कोटींचा महसूल मिळाला होता.

पिंपरी-चिंचवड शहरात आजमितीला पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे करआकारणी केली जाते. या मालमत्ताधारकांकडून 2018-19 या आर्थिक वर्षात महापालिका तिजोरीत 472 कोटी रुपये कर जमा झाला आहे.

महापालिकेला 2018-19 या आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून भरीव उत्पन्न मिळाले आहे. 31 मार्चअखेर महापालिकेला 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाला 455 कोटी रुपये उत्पन्नाचे उदिष्ट होते. विभागाने ते पूर्ण केले असून 55 कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळविले आहे, असे सह शहर अभियंता राजन पाटील यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्यातून सुमारे 40 कोटी रुपयांचे आणि आकाशचिन्ह परवाना विभागाकडून तीन कोटी 88 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अशा सर्व विभागांमधून महापालिकेच्या तिजोरीत 1 हजार 25 कोटींचा कोटींचा महसूल जमा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.