Pimpri: पालिका स्थायीची 11 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 11 कोटी 58 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

मनपाच्या प्राथमिक शाळांमध्ये इ. पहिली ते सातवीचा अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणेसाठी व केयान मशिन देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे एक कोटी पाच लाख 42 हजार रुपयांच्या खर्चास, पिंपरी येथील जमतानी चौक ते अशोक थिएटर जवळील पाण्याच्या टाकीपर्यंत नविन नलिका टाकण्यात येणार असून त्यासाठीच्या सुमारे 54 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चास, विद्युत विभागासाठी विविध टयुबलर व ऑक्टोगोनल पोल साहित्य खरेदीकामी येणा-या सुमारे 68 लाख 37 हजार रुपयांच्या खर्चासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेचे ‘अ’,’ब’,’क’,’इ’,’ग’,’फ’ व ‘ह’ प्रभागातील घरोघरचा कचरा गोळा करुन मोशी कचराडेपो येथे वाहतुक करणेसाठी येणा-या सुमारे सहा कोटी 78 लाख रुपयांच्या खर्चास, पाणीपुरवठा विभागाकडील जलशुध्दीकरण केंद्र से.23 करीता पाणी शुध्दीकरणासाठी द्रवरुप पॉली ऍल्युमिनियम क्लोराईड खरेदी करणेसाठी येणा-या सुमारे एक कोटी 80 लाख 51 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.