Pimpri : ‘फाडा’च्या यादीत असलेल्याच ‘बीएस 4’ वाहनांची 30 एप्रिलपूर्वी नोंदणी करा

एमपीसी न्यूज – बीएस 4 वाहनांच्या नोंदणीबाबत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशनने (FADA) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या यादीतीलच वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे. उप प्रादेशिक परिवहनविभागाच्या मेल आयडीवर कागदपत्रे पाठवून आपल्या बीएस 4 वाहनांची नोंदणी करावी, असेही आवाहन देखील त्याच्याकडून करण्यात आले आहे.

ज्या बीएस 4 वाहनांची विक्री 31 मार्च 2020 पूर्वी झालेली आहे. पण, त्यांची अद्याप नोंदणी पूर्ण झालेली नाही. अशा वाहनांची यादी फाडाने सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. या यादीतीलच बीएस 4 वाहनांची नोंदणी होणार असून नोंदणी न होणाऱ्या वाहनांबाबत संबंधित वितरक पूर्णपणे जबाबदार राहणार आहे. ही नोंदणी 30 एप्रिल 2020 पूर्वी करणे गरजेचे आहे.

नोंदणी करण्यासाठी dyrto14.regidelar@gmail. com या मेल आयडीवर वाहनाची सर्व कागदपत्रे, वाहनांचा चॅसिस, इंजिन क्रमांक, वाहन नोंदणी कागदपत्रे, चॅसिस क्रमांकाची प्रिंट, वाहनाचा फोटो, नोंदणी शुल्क, कर, प्रतिज्ञापत्र, वितारकाच्या स्वयंघोषणा पत्रासह सादर करावे लागणार आहे. असेही सगरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.