Pimpri: पूरग्रस्तांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपये

एमपीसी न्यूज – पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी येथील भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच लाख रूपयांचा डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली कोकणसह इतर जिल्ह्यात हाहाकार उडवला होता. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितिमुळे शहरी ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यामध्ये पुराच्या पाण्याचा सर्वात जास्त फटका बसलेल्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक वाघेरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच लाख रूपयांचा डिमांड ड्राफ्ट दिला आहे.

तसेच सांगली जिल्ह्यातील अंकली या गावातील एक हजार नागरिकांना ब्लॅंकेट तसेच 1200 नागरिकांना जॅकेटचे वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 याप्रमाणे दहा हजार वह्या व एक हजार विद्यार्थ्यांना कंपास वाटप करण्यात येणार असल्याचेही वाघेरे यांनी सांगितले. याशिवाय पिंपरीगाव व परिसरातील नागरिकांनी घेतलेल्या एक हात मदतीच्या उपक्रमांतर्गत 1200 पुरबाधित कुटुंबांना 10 दिवस पुरेल इतके औषधे, कपडे, अन्नधान्न अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, अशी माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.