Pimpri : श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी शासकीय सुट्टी, आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन (Pimpri) आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारच्या प्रशासन विभागाने तसे परिपत्रक काढले आहे. या निर्णयाचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी स्वागत केले आहे.

प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण व श्रींची प्राणप्रतिष्ठा दि.22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा आणि उत्सवाचा आहे. महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. तसेच, राज्यातील रामभक्त आणि विविध संघटनांनीही अशीच मागणी लावून धरली होती.

दरम्यान, केंद्र सरकारने दि. 22 जानेवारी रोजी अर्धा दिवस शासकीय सुट्टीबाबत गुरूवारी घोषणा केली. त्यानंतर आज राज्य सरकारच्या प्रशासन विभागाने श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.

PMAY : पिंपरी, आकुर्डीमधील प्रधानमंत्री आवास योजना ‘लॉटरी’ला अखेर ‘मुहूर्त’

आमदार महेश लांडगे म्हणाले की, तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम (Pimpri) यांचे जन्मभूमी अयोध्या येथे मंदिरात आगमन व प्राणप्रतिष्ठा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत असून, हा भारतीयांसाठी मोठा आनंदोत्सव व ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. नागरिकांची जनभावना लक्षात घेऊन राज्य शासनाने 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि हा दिवस सण-उत्सवाचा दिवस म्हणून घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री महोदय यांना केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तमाम रामभक्त आणि हिंदूत्ववादी देशवासीयांच्या वतीने आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.