Pimpri : चोरट्यांनी चार लाखांचा डंपर पळविला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेला डंपर चोरून नेल्याचा प्रकार मोहननगर चिंचवड येथे उघडकीस आला आहे.

दशरथ पांडुरंग जाधव (वय 32, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 6) रात्री नऊ ते मंगळवारी (दि. 7) सकाळी साडेआठच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. फिर्यादी जाधव यांचा चार लाखांचा डंपर कॅबिनचा दरवाजा लॉक करून मोहननगर, चिंचवड येथे पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी हा डंपर चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.