Pimpri : एटीएम फोडणाऱ्या टोळीकडून आणखी तीन गुन्ह्याची उकल; ‘पिंपरी पोलिसांच्या’ विशेष तपास पथकची कामगिरी

एमपीसी न्यूज – दरोडा, घरफोडीसह चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतीत एटीएम फोडल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आज चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी तीन गुन्ह्याची उकल झाली आहे.

अभिजीत उर्फ निकेतन गोकुळ साळवे (वय २२ वर्षे, रा. हरि निवास बिल्डींग फ्लॅट नं. १२ जिल्हा नाशिक), राहुल भगवान साळवे (वय २४ वर्षे, रा. नाशिक, द्वारका, जि. नाशिक), अरुण ज्ञानेश्वर भांगरे (वय २४ वर्षे, रा. संगमनेर जि. अहमदनगर) आणि सागर अनिल दैवज्ञ (वय २५ वर्षे रा. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केल्याची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तलायाचे कार्यक्षेत्रामध्ये ए.टी.एम. चोरीचे गुन्हे घडत असल्याने गुन्हयास आळा बसण्याच्या दृष्टीने नाकाबंदी, रात्रगस्त, संशयीत वाहने चेक केली जात आहेत. दरोडा, घरफोडीसह एटीएम फोडी आदी अशा गुन्ह्यांना प्रतिबध व्हावा. तसेच घडलेल्या गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल व्हावी, यासाठी सुमारे अकरा जणांचे विशेष तपास पथक नेमले आहे. यावेळी पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयामध्ये घडलेल्या सर्व ए.टी.एम चोरीच्या गुन्ह्याची बारकाईने अभ्यास करून अनेक बाहेरील राज्यामध्ये घडलेल्या गुन्ह्याबाबत तसेच त्यामध्ये अटक झालेल्या आरोपी माहिती घेऊन सविस्तर तपास सुरू केला आहे.

या अनुषंगाने, आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण हद्दीतीत आळेफाटा येथे दरोड्याच तयारीत असलेल्या अभिजीत उर्फ निकेतन गोकुळ साळवे, राहुल भगवान साळवे , अरुण ज्ञानेश्वर भांगरे आणि सागर अनिल दैवज्ञ यांना अटक केली. यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चिखली पोलीस स्टेशन येथे घडलेल्या काही गुन्ह्याशी मिळती जुळती असल्याचे उघडकीस आले.

या संशयित आरोपीना न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना वर्ग करून घेऊन चिखली पोलीस ठाणे येथील ए.टी.एम. फोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्र्यंकबेश्रर रोडला बाबा महाराज, नाशिक यांचे मठात घरफोडी चोरी केल्याचे तसेच उत्तमनगर नाशिक येथे आय.सी.आय.सी .आय बँकचे ए.टी.एम. फोडण्याचा प्रयत्न आणि त्र्यबंकेश्वर रोड येथील एस.बी.आय. बँकेचे ए.टी.एम. फोडण्याचा प्रयत्न असे एकूण तीन गुन्हे केल्याचे उघड झाले आहेत. याचा अधिक तपस विशेष तपास पथक करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.