Pimpri : ट्रकचा दुचाकीला कट; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रकने एका दुचाकीला कट मारला. यामध्ये दुचाकीस्वार (Pimpri)ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी पावणे दोन वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे घडली.

अक्षय तिम्मू भंडारी (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी (Pimpri)रमेश व्यंकटेश भंडारी (वय 35, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ बाळू धोत्रे (वय 41, रा. मरकळ, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pimpri :  पवना, इंद्रायणी या नद्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्प ‘एसईआयएए’च्या ना-हरकत दाखल्यामुळे  रखडला  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ याने त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच 20/बीटी 1733) हयगयीने चालवला. त्याने अक्षय भंडारी यांच्या दुचाकीला (एमएच 12/व्हीएम 7948) कट मारला.

 

त्यावेळी ट्रकचा दुचाकीला धक्का लागला आणि अक्षय यांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यामध्ये अक्षय ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.