Pimpri: विनाकारण दुचाकीची तोडफोड, गुन्हा दाखल

Pimpri: two-wheeler vandalism, crime filed आरोपीला अडविण्यासाठी फिर्यादी आणि त्याचा मुलगा गेले असता आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तर मुलाला मारहाण केली.

एमपीसी न्यूज – विनाकारण वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.1) रात्री आठ वाजताच्या सुमारास चिंचवड येथील रामनगर येथे घडली.

उषा जितेंद्र ननावरे (वय 40, रा. रामनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार तिरुपती शिवाजी जाधव (वय 26, रा. परशुराम चौक, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी यांचा मुलगा कामावरून घरी आला. त्याने त्याची होंडा शाईन (एमएच 14 जीजे 2335) ही दुचाकी घरासमोर पार्क केली. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने विनाकारण फिर्यादी यांच्या मुलाची दुचाकी फोडली.

यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले. आरोपीला अडविण्यासाठी फिर्यादी आणि त्याचा मुलगा गेले असता आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तर मुलाला मारहाण केली. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.