Pimpri : युवा सेनेच्या विभागीय सचिवपदी विश्वजीत बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे युवा (Pimpri) सेनेचे विश्वजीत बारणे यांची युवा सेनेच्या विभागीय सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी जाहीर केले आहे.

Chakan : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; 22 म्हशींची सुटका

विश्वजीत बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना प्रमुख(Pimpri) म्हणून काम पाहिले. त्यांच्याकडे युवासेना मावळ व पुणे लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता आणखी जबाबदारी वाढली आहे. त्यांना प्रदेशस्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

विश्वजीत यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.वडील खासदार श्रीरंग बारणे यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघात ते सातत्याने कार्यरत असतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.