Pimpri : महिलांनी केली ‘जित्याजागत्या’ वडाची पूजा ; शब्दधन काव्यमंचाचा अनोखा उपक्रम

Worship of 'Jityajagatya' Vad by women; A unique initiative of Shabdadhan Kavyamancha

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘घरीच रहा सुरक्षित रहा’ या आदेशाचे पालन करीत शब्दधन काव्यमंचाच्या महिला सदस्यांनी वटपौर्णिमेला एक अनोखा उपक्रम केला. या वर्षी कोरोनामुळे घराच्या बाहेर जाता येत नाही म्हणून आपल्या पतीला ओवाळून घरच्या घरी ‘जित्याजागत्या वडाची’ पूजा केली.

‘जन्मोजन्मी हाच पती लाभू दे’ हे मागणे मागत भारतीय महिला पारंपरिक पद्धतीने दरवर्षी वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी करतात. मात्र, या वर्षी कोरोनामुळे हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यामध्ये सुनंदा चव्हाण आणि सुभाष चव्हाण, कवयित्री संगीता झिंजुरके आणि सावळाराम झिंजुरके, जयश्री सरकाळे आणि कवी शामराव सरकाळे, जयश्री गुमास्ते आणि कवी निशिकांत गुमास्ते, सुनीता दळवी आणि मुरलीधर दळवी, लीना कोलते आणि हर्षल कोलते, मीरा कंक आणि कवी सुरेश कंक या दांपत्यांनी या ऐतिहासिक उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी महिलांनी घराबाहेर न पडता वडाऐवजी आपल्या पतीचे पूजन केले.

शब्दधन काव्यमंचाच्या सदस्य मीरा कंक यावेळी म्हणाल्या की, “प्रतिवर्षी वटपौर्णिमा महिलावर्ग उत्साहाने साजरा करीत असतो. वडाच्या झाडाचे पूजन करणे आणि पतीसाठी औक्षण मागणे हे यावर्षी कोरोनामुळे शक्य झाले नाही.

त्यामुळे शब्दधनच्या महिलांनी आपल्या पतीसाठी घरीच पारंपरिक पद्धतीने पतीला ओवाळून दीर्घायुष्य मागितले. कोरोनाच्या या संकटाने आम्हा महिलांना जणू काही नव्या दृष्टीने जगण्याची आणि नव्या वाटेने जाण्याची दिशाच दाखवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.