PMC : पुणे महापालिका व धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे 37 स्मशान भूमी आणि 12 कब्रिस्तानची भुमीची स्वच्छता; 211 टन कचरा संकलन

एमपीसी न्यूज – डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महापालिका (PMC) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील स्मशान भूमी, कब्रिस्तान व ख्रिश्चन दफनभूमी येथे रविवारी (दि.25) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, ज्यामध्ये तब्बल 211.405 टन कचरा संकलित करण्यात आला.

शहरातील 37 स्मशानभूमी, 12 कब्रिस्तान व 1 ख्रिश्चन दफनभूमी या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये अंदाजे 5 लाख 9 हजार 133 चौ.मीटरचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, पुणे महानगरपालिकेच्या संबंधीत क्षेत्रिय कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी असे एकूण 4 हजार 26 सदस्यांनी सहभाग घेतला होता. या सदस्यांनी एका दिवसात स्माशान भूमीमधून घेऊन 211.405 टन कचरा संकलित करण्यात आला.

Pune News : गुरुवारी वारजे आणि चांदणी चौक परिसरातील पाणीपुरवठा बंद

अस्वच्छ वातावरणामुळे आपल्या आजूबाजूला संसर्गजन्य आजार पसरतात व हे टाळण्यासाठी कच-याचे वर्गीकरण करणे, कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता मनपाने ठरवून दिलेल्या निर्धारित जागी टाकणे, प्लास्टिकचा वापर बंद करणे इ. गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा मी (PMC) एक सदस्य आहे. या भावनेतून स्वच्छता राखणे हे माझे सामाजिक कर्तव्य आहे असे प्रत्येकाने मानले पाहिजे व त्यानुसार आपला परिसर, आपले शहर स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी यावेळी केले.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत घेण्यात येणा-या या स्वच्छता मोहिमांद्वारे पुणे महानगरपालिकेस शहर स्वच्छतेच्या कामात नेहमीच मदत होत असून पुणे महानगरपालिका व डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने असे उपक्रम यापुढेही सातत्याने राबविले जातील असे यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त आशा राऊत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.